पुणे – अंतर्गत दहशतवादी कारवायांपासून सावध रहा

प्रातिनिधिक छायाचित्र

पुणे – भारताने सर्वांत मोठा सर्जिकल स्ट्राईक केला. त्यामुळे आता भारतातील शहरांतर्गत असलेले आपले दहशतवाद्यांचे नेटवर्क पाकिस्तानकडून आणखी “अॅक्‍टिव्हेट’ केले जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्‍यक आहे.

अनोळखी व्यक्ती किंवा अनोळखी वस्तू, संशयास्पद हालचाली यांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य आहे. याशिवाय एखाद्या व्यक्तीविषयी साधी शंका जरी आली, तरी त्याविषयी जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये माहिती देणे आवश्‍यक आहे. याशिवाय भाडेकरू ठेवताना व्यक्तीची संपूर्ण चौकशी करावी, वस्तू विकत घेताना, चलनाचा व्यवहार करताना फसवणूक होणार नाही ना, याची काळजी घ्यावी. याशिवाय बनावट नोटांच्या आधारे दहशतवादी शहरात व्यवहार करतात तर त्याला बळी पडू नये.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

12 दिवसांपूर्वी पाकिस्तानने पुलवामा हल्ला केला आणि त्याचा बदला भारताने 26 फेब्रुवारीला घेतला. यामुळे पाकिस्तानी यंत्रणा जरी हादरली असली, तरी पाकिस्तानने निर्माण केलेल्या दहशतवाद्यांच्या कारवाया भारतात छुप्या मार्गाने सुरू आहेत. अशावेळी त्यांनी नेमलेल्या माणसांचे जाळे म्हणजेच “स्लीपर सेल’ अशावेळी कार्यान्वित होतात हा आजपर्यंतचा अनुभव आहे. 1993 सालचा मुंबईतील बॉम्बस्फोट किंवा अन्य शहरातील बॉम्बस्फोट हा त्यातीलच एक भाग आहे. त्यामुळे या कारवाया हाणून पाडण्यासाठी सामान्य जनतेचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळेच नागरिकांनीही आता अलर्ट राहणे आवश्‍यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

पोलीसांनीही सतत मॉकड्रील घेऊन आपल्याविषयीचा नागरिकांचा विश्वास वाढवणे आवश्‍यक आहे. याशिवाय शहरातील महत्त्वाच्या ठिकाणचा बंदोबस्त वाढवणेही आवश्‍यक झाले आहे.

एसआयडीचे काम महत्त्वाचे
स्थानिक म्हणजेच राज्य स्तरावर एसआयडीसारख्या यंत्रणा अधिक सक्षमपणे कार्यान्वित होणे आवश्‍यक आहे. या यंत्रणांकडे कायमच दुय्यम स्थान म्हणून पाहिले जाते. मात्र अशावेळी या विभागांचे काम अतिशय महत्त्वाचे ठरते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)