निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नोटीसा बजावण्याची कार्यवाही
पुणे – लोकसभेच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी होणारा खर्च रोजच्या रोज देणे बंधनकारक आहे. मात्र, काही उमेदवारांनी अजूनही संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवडणुकीसाठीचा खर्च सादर केला नाही. त्यामुळे अशा उमेदवारांना नोटीसा बजावण्याची कार्यवाही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून करण्यात येत आहे.
जिल्ह्यात मावळ, शिरूर, पुणे व बारामती हे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. शिरूरमध्ये 23 उमेदवार रिंगणात असून यातील 11 उमेदवारांनी अद्यापही निवडणुकीचा खर्च प्रशासनाकडे सादर केला नाही. त्यामुळे या 11 उमेदवारांना नोटीसा देण्यात आला असून त्यांच्याकडून म्हणने मागविण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.