पुणे – औंध-सांगवी पुलाच्या रुंदीकरणास मंजुरी

स्थायी समितीची 23 कोटींच्या खर्चास मान्यता


पुणे, पिंपरी-चिंचवड पालिका करणार समान खर्च

पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीवरील औंध येथील मुळा नदीवरील सांगवी व वाकडला जोडणाऱ्या कै. रामजी विठ्ठल शिंदे पुलाच्या रुंदीकरणाच्या कामाला बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. या कामासाठी सुमारे 23 कोटींचा खर्च येणार आहे. या मार्गावरील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यांचे रुंदीकरण झाले असून पुणे महापालिकेनेही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते औंधपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण केले आहे. या पुलाच्या रुंदीकरणामुळे या मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षीत आणि गतीमान होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली. दरम्यान, या पुलामुळे या भागात होणारी वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेला जोडण्यासाठी औंध येथील मुळा नदीवरील पूल हा सर्वांत महत्त्वाचा दुवा आहे. मागील काही काळांत पिंपरी-चिंचवड महापालिकेने या पुलापर्यंतचे रस्ते प्रशस्त केले असून औंध चौक आणि सांगवी चौकात उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग तयार केले आहे. तसेच, पुणे महापालिकेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते औंधपर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. केवळ कै. रामजी विठ्ठल शिंदे पुलाची रुंदी ही कमी होती. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने संयुक्तरित्या या पुलाचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या रुंदीकरणाच्या कामासाठीचा येणारा समान खर्च दोन्ही महापालिकांकडून करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेने बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये या कामाची निविदा मंजुर करताना 23 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली, असल्याचे मुळीक यांनी स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)