पुणे – चित्रपट न प्रदर्शित झाल्याने कलाकारांनी दिला वितरकाला चोप

पुणे – नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाच्या कलाकारांनी वितरकाला भर रस्त्यात चोप दिला. हा सिनेमा जितक्‍या थिएटरमध्ये प्रदर्शित होणे अपेक्षित होते, तितक्‍या थिएटरमध्ये प्रदर्शित न केल्याने ही मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. जंगली महाराज रस्त्यावर ही घटना घडली. चित्रपटाला थिअटर्स न मिळाल्यामुळे आर्थिक नुकसान झाल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, याविरोधात दोन्ही पक्षांकडून पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. घटना घडल्यानंतर संभाजी चौकीतील मार्शलनी त्यांना चौकीत नेले होते.

हा सिनेमा राज्यातील 100 थिएटरमध्ये दाखविण्याचे आश्‍वासन वितरकांनी निर्मात्याला दिले होते. तसेच त्याबाबतचे पैसे देखील घेतले होते. प्रत्यक्षात हा सिनेमा केवळ 45 थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे आज या रागातून सिनेमातील कलाकार अविनाश खेडेकर आणि विशाल सांगळे यांनी वितरकाला चांगलाच चोप दिला.

यासंदर्भात डेक्‍कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी सांगितले, ही घटना घडल्यानंतर त्यांना चौकीत आणण्यात आले होते. मात्र, त्यांनी आमच्यामध्ये पैशाच्या व्यवहाराच्या देवाणघेवाणी संदर्भात चर्चेतून मार्ग निघाल्याने कोणत्याही प्रकारची तक्रार द्यायची नसल्याचे सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)