पुणे – आवास योजनेत आणखी 5 हजार घरे

पुणे – पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या खाजगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावरील 8 प्रकल्पांना राज्य व केंद्र शासनाने सोमवारी मान्यता दिली. महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी या प्रकल्पाचे सादरीकरण केले.

पुणे महानगरपालिकेमार्फत आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार खाजगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर पुणे महानगरपालिकेमार्फत एकूण 8 प्रस्ताव शासनास सादर करण्यात आले होते. यामध्ये मगरपट्टा सिटी डेव्हलपमेंट कंपनी यांचे मोहमंदवाडी-हडपसर या भागात एकूण 6 प्रस्ताव असून यामध्ये साधारण 5 हजार घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी बांधण्याचे नियोजन आहे. तसेच निर्वाणा लाईफ सिटी-लोहगाव येथे साधारण 299 घरे तसेच लाईफ सिझन डेव्हलपमेंट कंपनी यांचे धानोरी येथे परवडणाऱ्या 579 घरांचे नियोजन आहे. या प्रकल्पांना राज्यस्तरीय मान्यता व नियंत्रण समितीची शासनाची 22 फेब्रुवारी 2019 तसेच 25 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्रीय मान्यता व नियंत्रण समितीची मान्यता मिळाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)