पुणे – ‘निवडणूक प्रक्रियेत क्षेत्रीय अधिकारी महत्त्वाचा घटक’

पुणे – निवडणूक प्रक्रियेत क्षेत्रीय अधिकारी (झोनल ऑफीसर) हा महत्त्वाचा घटक असून निवडणूक कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्यामध्ये उत्तम समन्वय असला तरच निवडणूक योग्य पध्दतीने पार पडली जावू शकते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी केले.

जिल्हाधिकारी राम हे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील मतदार संघाचा दौरा करत असून विविध मतदान केंद्रांना भेट देत आहेत. या दरम्यान, मतदान केंद्रांची पाहणीही ते करत आहेत. शुक्रवारी त्यांनी भोर येथे पाहणी दौरा आयोजित केला होता. त्यांच्या समवेत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील हे होते. भोर येथील पंचायत समिती सभागृहात जिल्हाधिकारी राम आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी क्षेत्रीय अधिकारी तसेच निवडणुकीशी संबंधित सर्व अधिकारी-कर्मचारी यांची बैठक घेतली.

प्रत्येक अधिकाऱ्यांकडे असलेल्या मतदान केंद्रांची माहिती घेऊन तेथे असलेल्या मूलभूत सुविधांबाबत विचारणा जिल्हाधिकारी यांनी केली. इलेक्‍ट्रॉनिक वोटींग मशीन आणि व्हीव्हीपॅटचे कार्य कसे चालते, याबाबतही त्यांनी माहिती विचारली. यंदाच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचे महत्त्व लक्षात घेऊन सर्वांनी त्याचे अद्ययावत ज्ञान आणि हाताळणी बाबत दक्ष रहावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. आदर्श आचार संहिता, खर्च नियंत्रण कक्ष, भरारी पथक, सी-व्हीजील ऍप, मतदान यंत्रांची सुरक्षितता, वाहतूक आराखडा याबाबतही त्यांनी माहिती जाणून घेतली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)