पुणे – पावसाळ्यासाठी आपत्कालिन कार्यकेंद्र उभारणार

पुणे – पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यात करायची आपत्कालिन कामे व आपत्तीव्यवस्थापन यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर महापालिकेकडून आपत्कालिन कार्यकेंद्र उभारले जाणार आहे. या केंद्राची जबाबदारी महापालिका सहायक आयुक्तांकडे असणार असून, 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत ही केंद्र 24 तास सुरू असणार आहेत.

या केंद्रांसाठी प्रशासनाकडून एक स्वतंत्र संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिला जाणार असून आपत्ती व्यवस्थापनासाठी 25 कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत असणार आहे. पावसाळापूर्व नियोजनासाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत हे कक्ष स्थापन करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते.

गेल्या काही वर्षांत शहरात पावसाळ्यात नाले तसेच ड्रेनेज तुंबल्याने काही भागात पूरजन्यस्थिती उद्‌भवत आहे. तसेच खडकवासला धरणातून मुठा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यानंतर सिंहगडरस्ता, मध्यवर्ती पेठा, डेक्कन, वारजे, संगमवाडी भागांत काही ठिकाणी पुराचे पाणी घुसण्याचे प्रकार घडतात. तर नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यास नाल्यांचे पाणी साठून पूरजन्य स्थिती उद्‌भवते. अशा स्थितीत आपदग्रस्तांना तातडीची मदत व्हावी, यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर आपत्कालिन कार्यकेंद्र उभारले जाणार आहे. ही सर्व केंद्र महापालिकेचे अग्निशमन दल तसेच मुख्य इमारतीमधील आपत्कालिन केंद्राशी जोडली जाणार असून प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी 25 कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे. ज्यांच्यावर तातडीची मदत करण्याची जबाबदारी असून त्यांच्यावर दुर्घटनेच्या ठिकाणी असलेल्या नागरिकांचे स्थलांतरण करणे, तसेच इतर अत्यावश्‍यक प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी या पथकावर असेल

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)