पुणे – ऑगस्टमध्ये होणार सुधारित पाणी करार

पाटबंधारे विभागाने दिली मुदतवाढ : 17 टीएमसी पाण्याची मागणी


वॉटर ऑडिट, वॉटर बजेट सादर करण्याची अट


2011 ते 2019 यासाठी 11.50 टीएमसी पाणी मंजूर

पुणे – पालिका आणि पाटबंधारे विभागाचा करार 28 फेब्रुवारी रोजी संपला आहे. त्यानुसार महापालिकेस 2011 ते 2019 या कालावधीसाठी 11.50 टीएमसी पाणी मंजूर केले आहे. मात्र, शहरातील लोकसंख्या 52 लाखांच्या वर गेल्याने महापालिकेने 17 टीएमसी पाण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली होती. तर पालिकेस हे पाणी हवे असल्यास आधी वॉटर ऑडिट आणि वॉटर बजेट सादर करण्याची अट पालिकेस घातली आहे. त्यामुळे महापालिकेने सुधारित पाणीकरारासाठी 31 ऑगस्ट 2019 पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी पाटबंधारे विभागाने मान्य केली असल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.

महापालिका आणि पाटबंधारे विभागाचा करार 28 फेब्रुवारी रोजी संपला आहे. त्यानुसार महापालिकेस 2011 ते 2019 या कालावधीसाठी 11.50 टीएमसी पाणी मंजूर केले आहे. मात्र, शहरातील लोकसंख्या 52 लाखांच्या वर गेल्याने महापालिकेने 17 टीएमसी पाण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली आहे. मात्र, जलसंपदा विभागाने नवीन पाणी करार करताना, महापालिकेने आधी वॉटर ऑडीट आणि वॉटर बजेट सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, त्याशिवाय नवीन करार करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे एका बाजूला करार संपला असल्याने नवीन करार होण्यास विलंब होणार आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागास पत्र पाठवून महापालिकेस ऑडीट करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन पाटबंधारे विभागास पत्र पाठविण्यात आले असून त्याच्याकडे 31 ऑगस्ट 2019 पर्यंत चालू करार कायम ठेवण्याची मागणी केली होती. ती पाटबंधारे विभागाने मान्य केल्याने सुधारित करार ऑगस्ट 2019 मध्ये होणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच, त्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या ऑडीट आणि इतर बाबींची पूर्तता करण्याचे हाती घेण्यात आले असून ही माहिती पुढील काही महिन्यांत जलसंपदा विभागास सादर केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)