पुणे : पुण्यातील महात्मा फुले मंडई परिसरात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाला एक ऐतिहासिक महत्व आहे. दरवर्षीप्रमाणे गजानन शारदेची मूर्ती पर्यावरणपूरक आहे. शारदा गजाननाची विलोभनीय मूर्ती असे या “श्रीं’ चे वैशिष्ट्य असून ही मूर्ती उजव्या सोंडेची असून इच्छापूर्ती गणपती म्हणून ओळखली जाते.

पुण्यातील अखिल मंडई गणपती मंडळ यंदा  सव्वाशेव्या (१२५) वर्षांत पदार्पण करीत आहे. यंदा अखिल मंडई मंडळातर्फे काल्पनिक गजराज महाल साकारला आहे.

विशाल ताजणेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने हा महाल साकारला असून हा महाल साकारण्यासाठी ते गेल्या महिन्यांपासून काम करत आहेत. महालाचे काम अंतिम टप्यात असून एक ते दोन दिवसात देखावा सर्वांना पहाता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)