पुणे – आगीच्या घटनेनंतर पीएमपी बसेसचे ऑडिट सुरू

पुणे – धावत्या बसला आग लागण्याचे आणि बसेस ब्रेकडाऊन होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. असे प्रकार रोखण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ प्रशासनाने बसचे ऑडिट सुरूवात केले आहे. यासाठी प्रत्येक आगारामध्ये पाच अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती दररोज बसची तपासणी करत आहे. यामुळे या घटना भविष्यात कमी होतील, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

बसेसना आगीचे प्रकार रोखण्यासाठी पीएमपी प्रशासनाने सर्व 13 आगारात एकूण पाच अधिकारी व अभियंत्यांची टीम तयार केली आहे. त्यांच्याकडून प्रत्येक आगारातील बसची प्रत्येक टप्प्यात पाहणी करण्यात येईल. त्यांना दिलेल्या यादीनुसार प्रत्येक बसमधील बाबी तपासण्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे. यामध्ये वायरिंग आणि इंजिनशी संबंधित सर्व बाबी तपासल्या जात आहेत. ब्रेक, क्‍लच, गिअर बॉक्‍स, आसनांसह इतर आवश्‍यक गोष्टींबरोबरच चालकांकडून आलेल्या तक्रारींच्या आधारेही ऑडिट केले जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“पीएमपी’च्या ताफ्यात असणाऱ्या 2 हजारांहून अधिक बसेसपैकी सुमारे 1,400 बस पीएमपीच्या मालकीच्या तर उर्वरित बस ठेकेदारांकडील आहेत. प्रत्येक एक ते दीड महिन्याला पीएमपीची एक बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी पीएमपीकडून यापूर्वी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. ब्रेकडाऊनचे प्रमाणही अजून कमी झालेले नाही. दररोज किमान 150 बस बंद पडत आहेत. त्यामुळे दररोज 4,500 ते 5 हजार बस फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. परिणामी, प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. आरटीओकडूनही अनफिट बसवर कारवाई सुरू केली आहे.

प्रत्येक आगारात एक स्वतंत्र समिती आहे. सर्व समित्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी एक स्वतंत्र समितीही आहे. ही समिती प्रत्येक आगाराचा आढावा घेत आहे. त्यानुसार तपासणी करून कोणते भाग बदलायचे, दुरूस्त करायचे याचा निर्णय समिती घेत आहे.
– नयना गुंडे, अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)