पुणे – वेळेत लेखापरीक्षण अहवाल सादर न केल्यास अॅडव्हान्स परत

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत ज्या योजनाची अंमलबजावणी केली असून, त्या सर्व योजांचे लेखे व अहवाल सादर करणे आवश्‍यक आहे. वेळेत अहवाल सादर न करणाऱ्या महाविद्यालयाकडून विद्यापीठाने दिलेल्या प्रथम हफ्याची रक्‍कम विद्यापीठास परत द्यावी लागेल, असे स्पष्ट निर्देश विद्यीापठाने दिले आहेत.

महाविद्यालय अथवा संस्थेत शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये राबविण्यात आलेल्या योजनांचा सर्व लेखे दरवर्षीप्रमाणे केंद्रीय पद्धतीने स्वीकारून त्याचे परीक्षण करण्यात येणार आहे. पुणे शहरातील महाविद्यालयांसाठी 23 मार्च रोजी, ग्रामीण भागातील महाविद्यालयांसाठी दि. 22 मार्च, अहमनगर येथे 19 मार्च आणि नाशिक जिल्ह्यांसाठी 18 मार्च येथे महाविद्यालयाने सादर केलेल्या अहवालांवर परीक्षण करण्यात येणार आहे.

विद्यार्थी विकास मंडळाकडून कमवा व शिका योजना, निर्भय कन्या अभियान, आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण, 7 दिवसांचे जलसंधारण शिबिर, विद्यापीठस्तर स्पर्धा, गांडुळखत प्रकल्प, गिर्यारोहण शिबिरे, शैक्षणिक उपक्रमांतर्गत शिबिर इत्यादींचा समावेश आहे. राष्ट्रीय सेवा योजनेत विशेष शिबिरे, मूल्यमापन कार्यशाळासह अन्य उपक्रमांचा समावेश आहे. या योजना राबविल्यानंतर त्याचे लेखे सादर करणे आवश्‍यक आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे, वेळापत्रकाप्रमाणेच लेखे सादर करणे बंधनकारक आहे. वेळेत लेखे सादर न करणाऱ्या महाविद्यालयात ही योजना राबविण्यात आली नाही, असे ग्राह्य धरले जाईल. त्या महाविद्यालयांकडून विद्यापीठाने दिलेली प्रथम हप्याची रक्‍कम विद्यापीठास परत द्यावी लागेल, असेही राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. प्रभाकर देसाई यांनी पत्रकाद्वारे सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)