पुणे – विशेष मोहिमेत 12 हजार वाहनांवर कारवाई

पुणे – वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. मुदतबाह्य झालेल्या आणि वाहतुकीच्या इतर नियमांचा भंग करणाऱ्या वाहनांवर वाहतूक शाखेने 18 मार्चपासून कारवाई सुरू केली असून यात 12 हजार वाहनांचा समावेश आहे.

पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्या सूचनेप्रमाणे व वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्याकडून कारवाई करण्यात आली. शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाकडून नियमित प्रयत्न होत असून त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. वाहनचालकांनी शिस्तीचे पालन करुन त्यांच्यात वाहतूक नियमांविषयी जनजागृती व्हावी, यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)