पुणे – दुचाकी पेटविण्याचे सत्र सुरूच

पुणे – शहरात दुचाकी पेटवण्याचे सत्र अद्यापही थांबेनासे झाले आहे. पूर्ववैमनस्य आणी किरकोळ वादातून रस्त्यावर लावलेल्या दुचाकींची तोडफोड तसेच त्या पेटवण्याचे प्रकार घडत आहेत. पुणे-मुंबई रस्त्यावरील वाकडेवाडी भागात असलेल्या महापालिकेच्या वसाहतीत तसेच कोथरूड भागात दोन दुचाकी पेटवून देण्यात आल्या.

याप्रकरणी वाकडेवाडी भागातील महापालिका वसाहतीतील रहिवासी सुमित आढाव यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आढाव यांनी त्यांची दुचाकी घरासमोर लावली होती. मध्यरात्री दीडच्या सुमारास अज्ञाताने आढाव यांच्या दुचाकीवर पेट्रोल ओतून पेटवून दिली. आढाव यांची दुचाकी पेटवून दिल्यानंतर मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या रहिवाशांच्या निदर्शनास हा प्रकार आला. आढाव यांची दुचाकी वादातून पेटवून देण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. एस.देवकर करत आहेत. तसेच कोथरूडमधील शास्त्रीनगर परिसरातील रहिवासी किरण शिवाजी साठे यांची दुचाकी दोन दिवसांपूर्वी पहाटे चारच्या सुमारास पेटवून देण्यात आली आहे. साठे यांनी याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक मुंढे तपास करत आहेत. मध्यंतरी सोमवार पेठेतील नागेश्वर मंदिराजवळ टोळक्‍याने दहशत निर्माण करण्यासाठी मोटार, दुचाकी, टेम्पो, रिक्षा अशा वाहनांची तोडफोड केली होती. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलांसह साथीदारांना अटक केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)