पुणे – आणखी 940 बसेस दाखल होणार

जुन्या बसेस ताफ्यातून हद्दपार करणार : प्रशासनाचा दावा

पुणे – दिवसेंदिवस बसेसच्या बिघडत्या परिस्थितीमुळे पीएमपीएमएल महामंडळाच्या उत्पन्नावर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे काही जुन्या बसेस ताफ्यातून हद्दपार करुन या वर्षाअखेरपर्यंत पीएमपीच्या ताफ्यात नव्याने सुमारे 940 बसेस दाखल करण्यात येणार आहेत, असा दावा पीएमपीच्या वतीने करण्यात आला.

शहराची प्रमुख सार्वजनिक वाहतूक असणाऱ्या पीएमपी बस सध्या बिकट अवस्थेत आहे. वारंवार होणारे ब्रेक डाऊन, बसेस भर रस्त्यामध्ये बंद पडणे, अपघात होणे आदी घटना बसेस “अनफीट’ असल्याने घडत आहेत. परिणामी, या परिस्थितीवर प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दिवसेंदिवस बिकट होत जाणाऱ्या परिस्थितीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाने ताफ्यात नव्या बसेस दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या पीएमपीच्या ताफ्यात स्वत:च्या मालकीच्या जवळपास 1,900 बसेस आहेत. मात्र त्यापैकी सुमारे 100 बसेसचे आयुर्मान संपले आहे. त्यामुळे नव्या बस खरेदीच्या प्रयत्नात असून लवकरच पीएमपीएमएलच्या ताफ्यात नव्या 940 बस दाखल होणार आहेत. त्यापैकी 500 ई-बस बस, तर 440 सीएनजी बस खरेदी करण्यात येणार असून त्या डिसेंबर 2019 पर्यंत दाखल होणार आहेत, अशी माहिती पीएमपी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

नव्याने दाखल होणाऱ्या बसेसमुळे ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी होणार असून या बसद्वारे इंधन बचत करता येणार आहे. त्यामुळे पीएमपीएमएलच्या उत्पन्न वाढीला हातभार लागण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)