पुणे – सौर कृषी पंपांसाठी 933 अर्ज

पुणे – मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेत सहभागी होण्यासाठी तीन व पाच एचपीच्या कृषीपंपांसाठी लाभार्थी हिस्सा तब्बल 4 हजार 445 ते 13 हजार 740 रुपयांनी कमी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात सौर कृषीपंपांसाठी आतापर्यंत 933 अर्ज प्राप्त झाले आहेत.

राज्य शासनाने सौर कृषीपंप योजनेसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास मंजुरी दिल्यानंतर प्राप्त झालेल्या निविदांद्वारे सौर कृषीपंपाच्या 3 एचपी डीसी पंपासाठी 1 लाख 65 हजार 594 रुपये आणि 5 एचपी डीसी पंपासाठी 2 लाख 47 हजार 106 रुपये निश्‍चित झाली आहे. पूर्वीच्या आधारभूत किमतीत मोठी घट झाल्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील तसेच अनुसूचित गटातील लाभार्थ्यांचा अनुक्रमे 10 टक्‍के व 5 टक्‍के लाभार्थी हिस्सा 13 हजार 740 रुपयांपर्यंत कमी झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याआधी 3 एचपी सौर कृषीपंपासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 10 टक्‍के म्हणजे 25 हजार 500 रुपये भरावे लागत होते. यात 8 हजार 940 रुपये कमी करण्यात आले असून आता 16 हजार 560 रुपये भरावे लागणार आहेत. तसेच अनुसूचित जातींमधील लाभार्थ्यांना 5 टक्‍के म्हणजे 12 हजार 725 रुपये भरावे लागत होते. यात 4 हजार 445 रुपये कमी करण्यात असून आता 8 हजार 280 रुपये भरावे लागणार आहेत.

182 जणांना कोटेशन
पुणे जिल्ह्यातील 933 शेतकऱ्यांनी सौर कृषीपंपांसाठी ऑनलाइन अर्ज केले असून 182 जणांना कोटेशन देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना दिवसा व सौर ऊर्जेद्वारे शाश्‍वत वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना राज्यभरात राबविण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे शाश्‍वत जलस्त्रोत उपलब्ध आहेत व यापूर्वी कृषीपंपासाठी वीजजोडणी घेतलेली नाही किंवा वीजजोडणीचे पैसे भरून अद्याप वीजजोडणी प्रलंबित आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य देण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)