पुणे – 6 हजार दिव्यांग विद्यार्थी देणार परीक्षा

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातील एकूण 6 हजार 24 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या मागणीनुसार मान्य करण्यात आलेल्या सवलती देण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांनी परीक्षांचे अर्ज भरतानाच दिव्यागांचा प्रकार, प्रमाण व स्वरूप याबाबतची माहिती नमूद केली आहे. विभागीय मंडळानुसार पुण्यात 886, नागपूरमध्ये 663, औरंगाबादमध्ये 584, मुंबईत 1 हजार 877, कोल्हापूरमध्ये 452, अमरावतीत 685, नाशिकमध्ये 449, लातूरमध्ये 309, कोकणात 119 याप्रमाणे दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. या विद्यार्थ्यांनी रायटर, वाढीव वेळ यासह इतर काही सवलतींसाठी विभागीय मंडळांकडे लेखी अर्जाद्वारे मागणी केलेली आहे. त्यानुसार अर्ज व संबंधित कागदपत्रांची तपासणी करून विद्यार्थ्यांना सवलती देण्यात येणार असून त्याबाबतची मान्यता पत्रेही विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे. या पत्रानुसार परीक्षा केंद्रावर त्यांची अंमलबजावणी पर्यवेक्षकांना करावी लागणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पेपरनुसार प्रतितास 20 मिनिटे याप्रमाणे दिव्यांगांना परीक्षेसाठी जादा वेळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वत:च रायटरची उपलब्धता तयार ठेवण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांसाठी रायटर उपलब्ध होत नसल्यास संबंधित परीक्षा केंद्रांनी त्याची व्यवस्था करणे आवश्‍यक आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्याचे नियोजनही केंद्रांनाच करावे लागणार आहे, असे राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

कॅलक्‍युलेटर वापरण्यास परवानगी
राज्य शासनाच्या निर्णयानुसार गणित, पुस्तपालन व लेखाकर्म, भौतिकशास्त्र, रसायशास्त्र या विषयांच्या परीक्षांसाठी कॅलक्‍युलेटर वापरण्यास परवानगी देण्यात येणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांना स्वत:चा कॅलक्‍युलेटर आणावा लागणार आहे. मोबाइलमधील अथवा इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स साधनांमधील कॅलक्‍युलेटर वापरता येणार नाही, असे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)