पुणे – दोन दिवसांत 5 जणांना स्वाईन फ्लूची लागण

File Photo

पुणे – शहरातील कमाल तापमानाने चाळीशी गाठली असून, अंगाची लाही लाही होत आहे. असे असतानाही स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होण्याएवजी वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसांत केलेल्या तपासणीमध्ये पाच व्यक्तींना स्वाईन फ्लूची लागण झाली असून, तब्बल 121 संशयीत रुग्णांना टॅमीफ्लूच्या गोळ्या देऊन आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मागील पंधरा दिवसांपूर्वी शहरात ढगाळ हवामान आणि मध्येच उन्ह अशा वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे, डोकेदुखीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली होती. परंतु, मागील चार दिवसांपासून उन्हाचा चटका वाढल्यामुळे स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होईल, असे वाटत असताना प्रादुर्भाव वाढतच असल्याचे तपासणी अहवालातून समोर आले आहे. दिवसभरात 3 हजार 337 व्यक्तींची स्वाईन फ्लू तपासणी करण्यात आली. त्यामध्ये पाच व्यक्ती स्वाईन फ्लूचे आढळून आले. सद्यस्थितीत शहरातील विविध रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लूचे 13 रूग्ण उपचार घेत असून, 9 रुग्णांवर अतिदक्षता (आयसीयु) विभागात उपचार सुरू आहेत. गुरुवारी (दि. 28) अतिदक्षता विभागात आणखीन एक रूग्ण वाढल्यामुळे रुग्णांची संख्या 10 झाली असून, 4 रुग्णांवर वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)