पुणे – दलितवस्ती सुधारणासाठी 35 कोटी

दौंड तालुक्‍यात सर्वांधिक विकासकामांना मंजुरी

पुणे – जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून दलितवस्ती सुधारणा योजनेंतर्गत दलित वस्त्यांच्या विकासकामांसाठी 35 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये दौंड तालुक्‍यात सर्वांधिक दलित वस्त्यांच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे, अशी माहिती सभापती राणी शेळके यांनी दिली.

-Ads-

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या (दलितवस्ती सुधार योजना) वस्त्यांचा विकासासाठी समाजकल्याण विभागाकडून 2018-19 या प्रत्येक तालुक्‍यातील विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये रस्ते, बंदिस्त गटार, समाजमंदिर बांधकाम, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रकाश व्यवस्था आणि शौचालय आदी विकासकामे करण्यात येणार आहेत. यामध्ये दौंड तालुक्‍याला सर्वांधिक 152 कामांसाठी 8 कोटी 26 लाखांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. तर इंदापूरमध्ये 133 कामांना मंजुरी देण्यात आली असून, 6 कोटी 93 लाखांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. त्यामुळे या वस्त्यांचा विकासाला गती मिळणार आहे.

तालुकानिहाय मंजुर निधी
आंबेगाव – 98 लक्ष 84 हजार, बारामती – 5 कोटी 46 हजार, भोर – 1 कोटी 21 हजार, हवेली – 70 लक्ष 65 हजार, जुन्नर – 1 कोटी 14 लाख, खेड – 2 कोटी 70 लाख, मावळ – 2 कोटी 34 लाख, मुळशी – 78 लाख 61 हजार, पुरंदर – 2 कोटी 5 लाख, शिरूर – 1 कोटी 83 लाख, वेल्हे – 59 लाख 97 हजार.

जिल्ह्यातील दलित वस्त्यांचा विकास व्हावा, त्यांचे जीवनमान उंचावे यासाठी दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत दौंड तालुक्‍यातील सर्वांधिक दलित वस्त्यांची विकासकामे व्हावीत, यासाठी समाजकल्याण विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार सर्वांधिक विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे.
– राणी शेळके, सभापती, महिला व कल्याण विभाग, जि. प. पुणे

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)