पुणे – ‘आरटीई’ प्रवेशासाठी 2 लाख 39 हजार अर्ज

प्रवेश क्षमतेपेक्षा दुप्पट संख्या : आज मुदत संपणार

पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार “आरटीई’ च्या 25 टक्के प्रवेशासाठी राज्यातून 2 लाख 39 हजार ऑनलाइन अर्ज दाखल झाले आहेत. उपलब्ध प्रवेश क्षमतेपेक्षा दुप्पट अर्ज आले असून अर्ज भरण्याची मुदत शनिवारी संपणार आहे.

“आरटीई’ची प्रवेश प्रक्रिया 5 मार्चपासून सुरू झाली. राज्यात एकूण 9 हजार 195 शाळांनी 1 लाख 16 हजार 895 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. जास्तीत जास्त पालकांना आपल्या मुलांचे प्रवेश अर्ज भरता यावेत, यासाठी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढही देण्यात आली होती. अनेकदा पालकांना अर्ज भरताना तांत्रिक अडचणींचा सामनाही करण्यात आला. शिक्षण विभागाकडून विविध शाळामध्ये मदत कक्षही उभारण्यात आले आहेत. मात्र, या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी संगणक, प्रिंटर, इंटरनेट आदी कोणतीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली नव्हती. यामुळे पालकांना सायबर कॅफेतच अर्ज भरण्यासाठी धाव घावी लागली. बहुसंख्य सायबर कॅफेत अर्ज भरण्यासाठी 200 ते 300 रुपये शुल्क पालकांकडून घेण्यात आल्याचेही उघडकीस आले आहेत.

राज्याच्या विविध जिल्ह्यात 2 लाख 38 हजार 377 अर्ज ऑनलाईन तर 889 अर्ज मोबाइल ऍपद्वारे पालकांकडून भरण्यात आले आहेत. मोबाइल ऍपऐवजी ऑनलाइनद्वारे अर्ज भरण्याला पालकांनी प्राधान्य दिल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक 52 हजार 951 तर सर्वात कमी नंदुरबारमधून 519 अर्ज दाखल झाले आहेत. पुणे. नाशिक, नागपूर, हिंगोली, औरंगाबाद, अमरावती या जिल्ह्यामध्ये उपलब्ध प्रवेशांच्या जागांपेक्षा तिप्पट अर्ज दाखल झाले आहेत.

जिल्हानिहाय दाखल झालेले अर्ज
अहमदनगर-5601, अकोला-6221, अमरावती-8226, औरंगाबाद-14113, भंडारा-2405, बीड-4931, बुलढाणा-5164, चंद्रपूर-3627, धुळे-2286, गडचिरोली-1173, गोंदिया-2627,हिंगोली-1909, जळगाव-6677, जालना-5665, कोल्हापूर-2616, लातूर-4031, मुंबई-11369,नागपूर-25704, नांदेड-7876, नंदुरबार-519, नाशिक-14317, उस्मानाबाद-2092, पालघर-1286, परभणी-2509, पुणे-52951, रायगड-6196, रत्नागिरी-941, सांगली-2070, सातारा-2331, सिंधुदुर्ग-665, सोलापूर-4883, ठाणे-15648, वर्धा-3984, वाशिम-1731, यवतमाळ-4922.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)