पुणे – 19 उड्डाणपूलांची होणार दुरुस्ती

सीओईपीला सल्लागार नेमण्यास स्थायीची मान्यता

पुणे – शहरातील जुन्या 19 पुलांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामास स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. दरम्यान, या पुलांच्या स्ट्रक्‍चर ऑडीटसाठी सल्लागार म्हणून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी)ची नेमणूक करण्यात आली असून त्यांना प्रकल्प खर्चाच्या दीड टक्‍के रक्‍कम सल्ला शुल्क म्हणून दिली जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरात मुठा नदीवर 20 वर्षांपेक्षा अधिक जुने पूल आहेत. महापालिकेकडून रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर महापालिकेने शहरातील या पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडीट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर गेल्या दोन वर्षांत सात ते आठ पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडीट करण्यात आले असून त्यांची देखभाल दुरुस्ती केली जात आहे. त्यासाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात दरवर्षी सुमारे 8 कोटींच्या निधीची तरतूद केली जात आहे. त्यानंतर आता उर्वरीत 19 पुलांच्याही देखभाल दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी सल्लागार म्हणून सीओईपीची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)