पुणे -11वी प्रवेश : प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

पुणे – राज्यातील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-2 भरण्याची सुविधा संकेतस्थळावर आज (बुधवार) पासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. प्रवेशाच्या पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी 6 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. शेवटची विशेष गुणवत्ता फेरी 31 जुलै रोजी जाहीर होणार आहे.

पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद या सहा विभागांसाठी प्रवेशाकरता सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच राबविण्यास गेल्या महिन्यापासून सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या माहिती पुस्तिका शाळांमध्ये उपलब्ध करुन देत प्रवेश अर्जाचा भाग-1 भरण्यासाठी 27 मेपासून संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यात विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक माहितीचा समावेश आहे. आता अर्जाचा भाग-2 भरण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. यात कनिष्ठ महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम नोंदवावा लागणार आहे. प्रवेशाच्या वेळापत्रकाबाबत अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीच्या अध्यक्षा मीनाक्षी राऊत यांनी माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)