आजच्याच दिवशी ‘या’ दोन भारतीय महिला क्रिकेटपटूंनी रचली होती विश्वविक्रमी भागीदारी

पुणे – क्रिकेट हा असा खेळ आहे ज्यामध्ये कोणता विक्रम केव्हा बनेल किंवा तो कसा व कोणी तोडेल हे सांगणे फार कठीण आहे. असाच एक विक्रम आजच्यादिवशी म्हणजे १५ मे २०१७ साली दिप्ती शर्मा आणि पुनम राऊत या जोडीने आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वविक्रमी भागीदारी रचली होती.

सेनवेस पार्कमध्ये झालेल्या चौरंगी वनडे मालिकेतील आयर्लंडविरूध्दच्या सामन्यात दीप्ति शर्मा आणि पूनम राउत या जोडीने चक्क ३२० धावांची विश्वविक्रमी भागीदारी केली होती. ३०० धावांची भागीदारी करणारी दीप्ती शर्मा आणि पूनम राऊत या दोघींची ही जगातील पहिलीच सलामीची जोडी ठरली होती. महिला एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील ही पहिली आणि अजूनपर्यंतची एकमेव त्रिशतकी भागीदारी आहे.

दीप्तीने १६० चेंडूंत २७ चौकार आणि दोन षटकारांसह १८८ धावांची खेळी केली होती. रेचल डिलेनीने दीप्तीला बाद करत ही जोडी फोडली, त्यानंतर पूनमही निवृत्त झाली होती. पूनमने ११६ चेंडूंत अकरा चौकारांसह १०९ धावांची खेळी केली होती.

दीप्ती-पूनम यांनी इंग्लंडच्या सारा टेलर आणि कॅरोलिन टेलर यांचा विक्रम मोडला होता. सारा-कॅरोलिन यांनी २००८ मध्ये लंडनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे लढतीत २६८ धावांची सलामी देऊन विश्वविक्रम प्रस्थापित केला होता.

तसेच महिलांच्या वनडे लढतीत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत भारताची दीप्ती शर्मा दुसऱ्या स्थानावर पोचली. एका लढतीत सर्वाधिक धावांचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कच्या नावावर आहे. बेलिंडाने १९९७ मध्ये डेन्मार्कविरुद्ध नाबाद २२९ धावांची खेळी करून विक्रम प्रस्थापित केला होता.

-स्वप्नील हजारे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)