#PulwamaAttack : दिल्ली पोलिसांकडून शहिदांच्या कुटुंबाना 1 कोटी रुपयाची मदत

नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांसाठी दिल्ली पोलिसांनी 1 कोटी रुपयाची मदत केली आहे. शुक्रवारी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. दिल्ली पोलिसांनी ‘वीर ऑफ इंडिया’ पोर्टलमध्ये हे योगदान दिले आहे. हे पोर्टल गृह मंत्रालयाने सुरू केले असून यावर जमा झालेली रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबाना दिली जाते.

१४ फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय रिझर्व पोलिस दलाचे (सीआरपीएफ) ४० सैनिक शहीद झाले. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबांसाठी राज्य सरकारच्या व्यतिरिक्त, देशभरातून अनेक लोक मदतीसाठी पुढे येत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)