#PulwamaAttack : जवानांवर हल्ल्यावेळी पंतप्रधान मोदी शूटिंगमध्ये व्यस्त – काँग्रेस 

नवी दिल्ली – पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आज पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. १४ फेब्रुवारी रोजी आपले ४० जवान शहीद झाले. यामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी कॉबेट पार्कमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. जगभरात असा पंतप्रधान आहे का?, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.

रणदीप सुरजेवाला यांनी म्हंटले कि, पुलावामामध्ये ३ वाजून १० मिनिटांनी हल्ला झाला. या हल्ल्यावर काँग्रेसने साडेपाच वाजता प्रतिक्रिया दिली. परंतु, यावर दोन शब्द बोलण्यासाठी मोदींकडे वेळ नव्हता. पंतप्रधान ६. १० वाजेपर्यंत शूटिंगमध्ये व्यस्त होते. दहशतवादी हल्ल्यानंतर देशाने चुल्हा बंद ठेवला होता. त्यावेळी मोदी उत्तराखंडच्या रामनगरस्थित गेस्ट हाऊसमध्ये चहा आणि नाश्त्याचा आनंद घेत होता. असा पंतप्रधान कुठे पहिला आहे का? अशा पंतप्रधानांसाठी आमच्याकडे शब्द नाहीत, असेही त्यांनी सांगितले. हल्ल्यानंतरही पंतप्रधान नौकाविहार कऱण्यात मग्न होते. त्यांच्या सभा थांबल्या नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

२६/११ च्या हल्ल्याचा उल्लेख करत ते पुढे म्हणाले, मुंबईवर दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी तत्कालीन सरकारवर टीका करत होते. तर काँग्रेसने राजकारण न करता सरकरसोबत उभे असल्याचे सांगितले. तसेच तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील यांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत तात्काळ राजीनामा दिला होता. परंतु, मोदी सरकार पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेण्यापासून हात का वर करत आहे? हाच भाजपचा राष्ट्रवाद आहे, अशा शब्दात सुरजेवाला यांनी टीका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)