#PulwamaAttack : हल्ल्यात पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयचा हात – भारतीय सैन्य

नवी दिल्ली – जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये ४० जवानांना आपला प्राण गमवावा लागला होता. या हल्ल्यामुळे सध्या देशभर संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर आज सैन्य, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीरचे पोलिसांनी पुलवामा हल्ल्यावर एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे. जैश-ए-मोहम्मद ही आतंकवादी संघटना पाकिस्तानी सैन्याचेच पिल्लू आहे. पाकिस्तानी सैन्याचा या हल्ल्यात पूर्ण हात आहे. तसेच काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण न केल्यास त्यांना थेट यमसदनी धाडले जाईल, असा कडक इशारा  ले. जनरल के जे एस ढिल्लन यांनी दिला.

-Ads-

ले. जनरल के जे एस ढिल्लन म्हणाले कि,  दहशतवाद्यांच्या पालकांनी त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगावे. आणि शांतता प्रस्थापित करा. सोबतच सामान्य माणसांनी चकमकीच्या ठिकाणांपासून लांब राहावे, अशी सूचनाही केली.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात पूर्णपणे पाकिस्तानी सैन्याचा आणि आयएसआयचा हात होता. पाकिस्तानी सैन्याने त्यांना मदत केली, यामध्ये कोणतीच शंका नाही. तसेच १०० तासाच्या आत ३ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जर कोणीही बंदूक हाती घेतली तर ठार मारले जातील, असेही त्यांनी सांगितले.

दहशतवादी संघटनांमध्ये युवकांचे सहभागी होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यामध्ये कुटुंबीयांची महत्वाची भूमिका आहे, असेही त्यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)