#PulwamaAttack : मोदी सरकारचा मोठा निर्णय; सैनिकांचा प्रवास आता हवाई मार्गे  

नवी दिल्ली – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. आता जम्मू-काश्मीमधील सर्व सुरक्षा दलातील जवानांना जम्मूहून श्रीनगरला नेण्यासाठी रस्त्याऐवजी विमान प्रवासाची सेवा पुरवली जाणार आहे. गृहमंत्रालयाचा हा निर्णय तात्काळ लागू होणार आहे. या निर्णयाचा ७ लाख ८० हजार जवानांना लाभ होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, बीएसएफ, आसाम रायफल्स, सीआरपीएफ, सीआयएसएफ, एसएसबी, एनएसजी आणि आयटीबीपीच्या जवानांना काश्मीर खोऱ्यात तैनातीसाठी हवाईमार्गे श्रीनगरचा प्रवास होणार आहे. सुट्टीवर जाताना, सुट्टीवरुन परतताना किंवा सुरक्षा दलाच्या पथकाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी हवाईमार्गाचा वापर केला जाणार आहे. याआधी ही सुविधा केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळत होती. परंतु, आता ही सुविधा सर्वांना पुरवली जाणार आहे.

दरम्यान, दिल्ली-श्रीनगर, श्रीनगर-दिल्ली आणि जम्मू-श्रीनगर व श्रीनगर-दिल्ली या मार्गावर विमान सेवेचा वापर केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)