#PulwamaAttack : भारताने विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळले पाहिजे – शशी थरूर  

नवी दिल्ली – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आयसीसी एकदिवसीय विश्वचषकामध्ये भारतीय संघाने पाकिस्तानसोबत खेळण्यास विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर भारताने विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळले पाहिजे. क्रिकेट सामना न खेळणे म्हणजे  शरणागती पत्करण्यापेक्षाही वाईट आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेता शशी थरूर यांनी ट्विटरवर दिली आहे.

शशी थरूर यांनी म्हंटले कि, १९९९ मध्ये कारगिल युद्ध झाल. त्यावर्षीही भारतीय क्रिकेट संघ विश्वचषकात पाकिस्तानशी खेळला आणि जिंकलासुद्धा. त्यामुळे यंदाच्या वर्षीही विश्वचषकात पाकिस्तानशी खेळावे. असे न केल्यास शत्रूशी दोन हात करण्याआधीच शरणागती पत्करली असे प्रतित होईल, असे त्यांनी म्हंटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, आगामी काळात भारतीय क्रिकेट संघ, बीसीसीआय आणि आयसीसी यांच्यामध्ये होणाऱ्या बैठकीत क्रिकेट सामन्यांविषयी काय निर्णय होतो, हे पाहणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)