#PulwamaAttack : भारत पाकविरोधात कठोर पावले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प 

वॉशिंग्टन – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले असून भारत पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हंटले आहे.  दोन्ही देशांमधील संबंध आता धोकादायक स्थितीत आहे. अनेक लोकांचा मृत्यू झाला असून आम्ही हे थांबवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प  म्हणाले कि, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये आजवरची सर्वात तणावाची परिस्थिती आहे. हा तणाव कमी व्हावा यासाठी आम्ही दोन्ही देशांच्या संपर्कात आहोत. भारतीयांच्या भावना आम्ही समजू शकतो. दोन्ही देशांमधील तणाव कमी व्हावा असा आमचा प्रयत्न आहे.

-Ads-

पाकिस्तानला अमेरिकेकडून १.३ अब्ज डॉलरची आर्थिक मदत दिली जायची. ती मदत आम्ही थांबवली आहे. आम्ही पाकिस्तानसोबत काही बैठका घेणार आहोत. पण पाकिस्तान अपेक्षित मदत करत नसल्याने मी मदत थांबवली, असे ट्रम्प यांनी सांगितले.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)