पुलवामा हल्ला म्हणजे मतांसाठी कारस्थान

रामगोपाल यादव यांच्या वक्‍तव्याने वादंग

इटावा  – पुलवामा दहशतवादी हल्ला म्हणजे मते मिळवण्यासाठीचे कारस्थान होते, असे वक्‍तव्य समाजवादी पक्षाचे (सप) ज्येष्ठ नेते रामगोपाल यादव यांनी गुरुवारी केले. त्यावरून वादंग निर्माण झाले आहे. मागील महिन्यात जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामात पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने भयंकर आत्मघाती हल्ला घडवला. आत्मघाती हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन सीआरपीएफच्या बसला धडकवले. त्यामुळे झालेल्या स्फोटात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले.

देशभरात संतापाची लाट उसळवणाऱ्या त्या घटनेचा उल्लेख रामगोपाल यांनी कारस्थान म्हणून केला. त्याबाबत उत्तरप्रदेशातील एका कार्यक्रमात बोलताना रामगोपाल म्हणाले, सीआरपीएफच्या जवानांना प्रथमच साध्या बसेसमधून पाठवण्यात आले. जम्मू आणि श्रीनगरदरम्यान प्रथमच कुठली चेकिंग नव्हती. त्यामुळे न थांबता वाहने पुढे निघून गेली आणि जीवितहानी झाली. ते कारस्थान होते. केंद्रात सरकार बदलल्यावर त्या घटनेचा तपास होईल. मते मिळवण्यासाठी आपल्या तरूणांना मृत्यूच्या दारात ढकलणारे महत्वाचे लोक तपासावेळी छाननीखाली येतील, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. दरम्यान, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वादग्रस्त वक्तव्यावरून रामगोपाल यांच्यावर पलटवार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)