PulwamaAttack : गृहमंत्र्यांची पाकिस्तान व अमेरिकाच्या भारतीय उच्चायुक्तांशी चर्चा

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे राजदूत हर्षवर्धन श्रिंगला

नवी दिल्ली : भारताचे पाकिस्तान उच्चायुक्त अजय बिसरीया आणि भारताचे अमेरिका उच्चायुक्त हर्ष वर्धन श्रींगला यांनी आज गृहमंत्री राजनाथ सिंह यांची पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढलेल्या तणावाच्या पार्शवभूमीवर भेट घेतली.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि पाकिस्तानचे भारतीय उच्चायुक्त अजय बिसरीया

भारताचे पाकिस्तान उच्चायुक्त अजय बिसरीया यांच्यासोबत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी २० मिनिटांच्या बैठकीमध्ये पुलवामा हल्ल्याबाबत प्रामुख्याने चर्चा केल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. पुलवामा हल्ल्यामध्ये ४० जवानांनी आपले प्राण गमावल्यानंतर भारताचे पाकिस्तान उच्चायुक्त अजय बिसरीया यांना केंद्र सरकारद्वारे सल्लामसलतीसाठी पाकिस्तानातून परत बोलावण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)