पाकिस्तानने जैशला अभय दिल्यानेच पुलवामा हल्ला – सुषमा स्वराज

वूझन (चीन): पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेला संरक्षण आणि अभय दिल्यानेच पुलवामा हल्ला झाला. पुलवामा दहशतवदी हल्ला जम्मू-काश्‍मीरमधील सुरक्षा दलांवर झालेला सर्वात घातक हल्ला होता. या सीआरपीएफच्या 40 जवानांनी आपले प्राण गमाविले, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे. वूझन येथे चीनचे परराष्ट्र मंत्री वॉंग यी यांच्या भेटीत त्या बोलत होत्या.

भारताने एयर स्ट्राईक करून पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी अड्डे उद्‌ध्वस्त केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या चीनच्या दौऱ्यावर आलेल्या आहेत. ही या वर्षातील पहिलीच भेट आहे. या निमित्तने परस्पर संबंधाचा आढावा घेऊन ते आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने पावले उचलली पाहिजेत, असे स्वराज म्हणाल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्‍या मसूद अजहर याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न भारताने अनेक वेळा केला. मात्र भारताचा राष्ट्रसंघातील हा प्रयत्न पाकिस्तानचा जवळचा मित्र असलेल्या चीनने दर वेळी हाणून पाडला. जैश-ए-मोहम्मद ह्या मसूद अजहरच्या संघटनेवर मात्र राष्ट्रसंघाने दहशतवादी संघटना म्हणून बंदी घातली आहे.
दरम्यान, पाकिस्तान आणि भारत दोघांनीही संयमाने आणि शांतीने पावले उचलली पाहिजेत, चीन त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय समाजाचे या घटनाक्रमावर लक्ष आल्याचे वॉंग यी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)