सिंधूबद्दल पुल्लेला गोपीचंद यांना विश्‍वास!

हैदराबाद: सिंधूचा सध्याच अफलातून फॉर्म पाहता आशियाई स्पर्धेत तिच्याकडून मोठ्या अपेक्षा असल्याचे मुख्य प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी म्हटले आहे. जागतिक स्पर्धेतील सिंधूची कामगिरी खरोखरीच अद्वितीय होती. तिने उपान्त्य फेरीत ओकुहाराला, तर उपान्त्य फेरीत यामागुचीला पराभूत केले. या दोघींना सलग सामन्यांत पराभूत करणे ही कल्पनातीत कामगिरी होती. मेरिनविरुद्ध अंतिम फेरीतील तिचा पराभव थोडा निराशाजनक होता.
परंतु मेरिनसारख्या खेळाडूविरुद्धचा पराभव मनाला लावून घेण्याचे कारण नाही. एक तर मेरिन ही एकमेवाद्वितीय खेळाडू आहे आणि रिओ ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत मेरिनकडून पराभूत झाल्यानंतरही सिंधूने पुढच्या स्पर्धेत तिला हरविले होते. जागतिक स्पर्धेत पुरुष व महिला गटांत मिळून भारताच्या चार खेळाडूंनी उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. त्यात श्रीकांत आणि प्रणय यांच्याकडून सरस कामगिरीची अपेक्षा होती. परंतु आशियाई स्पर्धेतहीे यंदाच्या वर्षातील यशोमालिका कायम राहील यात मला शंका नाही. महिला व पुरुष संघही पदके जिंकतील असे मला वाटते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)