पहिल्या कसोटीसाठी पुजारा, कुलदीपला वगळले

बर्मिंगहॅम: भारताने पहिल्या कसोटीसाठी शेवटच्या क्षणी जाहीर केलेल्या 11 खेळाडूंच्या अंतिम संघातून दोन नावे वगळताना धक्‍के दिले. भारताने अनुभवी कसोटीपटू चेतेश्‍वर पुजाराला वगळून त्याच्या जागी सलामीवीर लोकेश राहुलची निवड केली तसेच बहुचर्चित चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला बाहेर ठेवून त्याच्या जागी हार्दिक पांड्याची निवड केली. त्यामुळे भारतीय संघ या कसोटीत रविचंद्रन अश्‍विन या एकमेव फिरकी गोलंदाजासह खेळत आहे.

उमेश यादव, ईशांत शर्मा व महंमद शमी यांच्यासह हार्दिक पांड्यामुळे भारतीय संघाने चार वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. टी-20 मालिका, तसेच एकदिवसीय मालिकेत सपशेल अपयशी ठरलेला सलामीवीर शिखर धवनला वगळण्याबद्दलही भारतीय संघव्यवस्थापनावर दबाव होता. परंतु धवनवर विश्‍वास ठेवण्याचा निर्णय भारतीय संघव्यवस्थापनाने घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुजाराने यंदाच्या मोसमात अद्याप एकही अर्धशतक केलेले नसून त्याचा फॉर्म शंकास्पदच आहे. इंग्लंडने अंतिम 11 खेळाडूंचा संघ कालच जाहीर केला होता. त्यानुसार इंग्लंडच्या संघात केवळ अदिल रशीद या एकाच फिरकी गोलंदाजाचा समावेश असून जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड व सॅम करन या तीन वेगवान गोलंदाजांसह बेन स्टोक्‍सच्या समावेशामुळे इंग्लंडकडे चार वेगवान गोलंदाजांचा ताफा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)