‘सुर्यवंशी’मध्ये अक्षय कुमारसोबत पुजा हेगडे

बॉक्‍स ऑफिसवर दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ चित्रपटाने तुफान कमाई केली आहे. “सिम्बा’ने आतापर्यंत 200 कोटींचा धंदा केला आहे. त्याच्या रेकॉर्डब्रेक घोडदौडीचा वेग अजूनही कमी झालेला नाही. किमान आठवड्याभरात आणखी 100 कोटींची उलाढाल “सिम्बा’ नक्की करेल असा अंदाज आहे. रोहित शेट्टीने यामध्ये आपल्या आगामी सुर्यवंशी चित्रपटाची एक झलक दाखविली. यात खिलाडी अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

एप्रिल महिन्यात सुर्यवंशी चित्रपटाची शूटिंग सुरू होणार आहे. तसेच चित्रपट 27 डिसेंबरच्या आसपास प्रदर्शित केला जाणार असून यात अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिका साकारणार असल्याचे सांगितले जात आहे. पण या चित्रपटात अभिनेत्रीची भूमिका केवळ 15 ते 20 मिनिटे असणार आहे. पूजाने या चित्रपटात अपोझिट भूमिका साकारावी अशी इच्छा अक्षयने रोहितजवळ व्यक्त केली होती. तसेच अक्षयच्या ‘हाऊसफुल 4’ मध्ये पूजा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याशिवाय महेश बाबूबरोबरच्या “महर्षी’मध्येही ती असणार आहे. त्यानंतर प्रभास बरोबरच्या “साहो’मध्येही ती लीड रोलमध्ये दिसणार आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)