पीएसएलव्हीचे काउंटडाऊन सुरू

बंगळूरू: भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) ने आपल्या पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल (पीएसएलव्ही) सी-43चे काउंटडाऊन आज सुरू करण्यात आले आहे. या उपग्रहाच्या मदतीने गुरुवारी सकाळी 8 देशांचे 30 उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहेत. या 30 पैकी तब्बल 23 उपग्रह हे अमेरिकेचे आहेत. सोबत भारताचा हायपरस्पेक्‍ट्रल इमेजिंग सॅटेलाइटदेखील अवकाशात झेपावणार आहे. हे पीएसएलव्हीचे 45वे प्रक्षेपण आहे.

याबाबत इस्रोने एक निवेदन जारी केले आहे. सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही-सी 43च्या उड्डाणाचे काउंटडाऊन बुधवारी पहाटे 5.58 वाजता सुरू करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी 9.58 वाजता हे प्रक्षेपण होणार आहे. पीएसएलव्ही सी-43 मोहीमेचा हा प्राथमिक उपग्रह आहे.

-Ads-

हा उपग्रह सूर्याच्या कक्षेत 97.957 अंशात फिरणार असून 5 वर्षे कार्यरत राहणार आहे. या उपग्रहासह अवकाशात झेपावणाऱ्या 30 विदेशी उपग्रहांपैकी एक मायक्रो, तर 29 नॅनो उपग्रह आहेत. अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया, फिनलॅंड, मलेशिया, नेदरलॅंड आणि स्पेन या 8 देशांचे हे उपग्रह आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)