सौरव गांगुली आणि रोहित शर्मा यांच्या यादीत सामील होण्याची पृथ्वी शॉ ला संधी !

आपल्या कसोटी कारकिर्दीच्या पदार्पणाच्या सामन्यातच शतकी खेळी करून पृथ्वी शॉ याने अनेक क्रीडा प्रेमींचे मन जिकंले आहे. त्याच्या शतकीखेळी पेक्षा त्यांच्या निर्भीड पण तंत्रशुद्ध खेळीचे जास्त कौतुक झाले. पहिल्याच कसोटी सामन्यात शतकी खेळी केल्याने त्याच्याकडून दुसऱ्या कसोटीत देखील चांगल्या खेळाची आणि शतकाची अपेक्षा केली जात आहे.

भारत विरुद्ध वेस्टइंडीज मालिकेतील  दुसरा कसोटी सामना १२ ऑक्टोबर रोजी हैद्राबाद येथे होणार आहे. जर त्याने दुसऱ्या सामन्यात देखील शतकी खेळी केली तर तो सौरव गांगुली आणि रोहित शर्मा यांच्यासारख्या दिग्गजांच्या यादीत जाऊन बसेल. सौरव गांगुली आणि रोहित शर्मा यांनी आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात शतकी खेळ्या केल्या होत्या.

सौरव गांगुलीने इंग्लडविरुद्ध आपल्या कारकिर्दीची सुरुवात करताना पहिल्या सामन्यात लॉर्ड्स येथे १३१ तर दुसरा सामना नॉटिंघम येथे १३६ धावांची  शतकी खेळी केली होती. तर रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीचा पहिला सामना वेस्टइंडीज विरुद्ध कोलकाता येथे खेळला होता त्यात त्याईनं १७७ धावा बनविल्याहोत्या. दुसरा कसोटी सामना आत्याने मुंबईत खेळला आणि त्यात देखील त्याने १११ धावांची शतकी खेळी केली होती.

पृथ्वी शॉ याने जर पहिल्या कसोटी सामन्यातील लय पुन्हा पकडली आणि जर त्याने दुसऱ्या सामन्यात देखील शतकी खेळी केली तरकारकिर्दीच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या काही खास खेळाडूंच्या खास यादीत आपले स्थान निश्चित करेल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)