मुस्लिम आरक्षणासाठी निदर्शने 

निर्णय घ्या अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
सातारा- शिक्षणापासून गेली अनेक पिढ्या वंचित राहिलेल्या मुस्लिम समाजाला तात्काळ 5 टक्के आरक्षणाचा निर्णय घ्या, मागणीसाठी जमीयत-उलेमा-ए हिंद संघटनेने मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली तसेच मागणी ताताकाळ मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.
मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सच्चर कमिटी, न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा कमिशन तसेच मेहमूर्दरेहमान अभ्यास गटाने मुस्लिम समाजाचे आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक स्थिती समाजासमोर आणली. राज्य शासनाने शैक्षणिक व नोकरीमध्ये मराठा समाजाला 16 टक्के व मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याचा अध्यादेश काढला. मात्र अध्यादेशाची कालमर्यादा संपल्यानंतर शासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही. सध्या मराठा समाजाच्या आरक्षणावर मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक पाऊले पउत आहेत मात्र मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत उदासिनता अस्वस्थ करणारी आहे. तरी शासनाने लवकरात लवकर मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)