आई वडीलापासून संरक्षण मागणाऱ्या त्या मुलीला संरक्षण द्या – उच्च न्यायालय

उच्च न्यायालयाचे तळेगाव पोलीसांना आदेश

मुंबई – आंतरजातीय प्रेमप्रकरणाला विरोध करणाऱ्या जन्मदात्या आई-वडिलांकडूनच जीवाला धोका
असल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या प्रियंकाची रितसर तक्रार नोंदवून घ्या . तिच्या सुरक्षेचे
उपाय करा.असे निर्देश सुट्टीकालीन न्यायालयाचे न्या. एम.एस. कर्णिक आणि न्या. रियाझ छागला यांच्या
खंडपीठाने तळेगाव पोलीसांना दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आंतरजातीय मुलाच्या प्रेमात पडलेल्या 19 वर्षाच्या प्रियांकाने आई वडील आणि कुटुबियांकडून जीवितास धोका
असल्याने संरक्षणाची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांच्यावतीने नितीन सातपूते यांनी युक्तीवाद करताना प्रियंका आणि तिचा प्रियकर यांच्यात गेली तीन वर्शापासुन प्रेमसंबंध आहेत. ही बाब प्रियांकाच्या आई वडीलांसह कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी या दोघांना ठार मारण्याची धमकी दिली. या संदर्भात पोलीस तक्रार करण्याचा प्रयत्न केला परंतू पोलीस तक्रार दाखल करून घेण्यास तयार नाहीत असा आरोप प्रियांकाने केला. मात्र हा आरोप पोलीसांनी फेटाळून लावला आणि मुलीने तक्रार केली नसल्याचे न्यायालयात सांगितले. याची दखल घेऊन न्यायालयाने मुलीची तक्रार नोदवून तिच्या सुरक्षेचे उपाय करा असे निर्देश तळेगाव पोलीसांना दिले आणि याचिकेची सुनावणी दोन आठवडे तहकूब ठेवली.


गावठी कट्टा डोक्‍याला लावून धमकावले
विधी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला आलेल्या प्रियांका कथित निम्न जातीतील 19 वर्षीच्या मुलाच्या प्रेमात पडली.
ही गोष्ट ज्यावेळी आई वडीलांना समजली . त्यावेळी त्यांनी तिला मारहाण केली. कॉलेजमध्ये जाण्यासही बंदी
घातली. एवढ्यावरच न थांबता वकील असलेल्या काकाने संतापाच्या भरात गावठी कट्टा आणून थेट डोक्‍याला लावून धमकावले. हे प्रेमसंबंध तोडले नाही तर दोघांनाही जीवे मारण्याची धमकीही त्यांनी दिली. अखेर प्रियांकाने आपल्या प्रियकराच्या कुटूबियांचा आश्रय घेतला. आणि आपल्या आई वडिलाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून पोलीस संरक्षण देण्याची विनंती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)