“आमच्या वायुदलाच्या वैमानिकाला सुरक्षित ठेवा अन्यथा…” : भारताचा पाकिस्तानला इशारा

नवी दिल्ली : आज सकाळी भारतीय वायू सीमेमध्ये प्रवेश करत पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारतीय सैन्य दलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र तत्पर असलेल्या भारतीय वायुदलातर्फे जम्मू येथील राजोरी भागामध्ये पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडून हा हल्ला अयशस्वी करण्यात आला. भारतीय सीमेमध्ये घुसलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना पाडण्याच्या कारवाई दरम्यान भारताचे मिग २१ हे विमान बेपत्ता झाले असून या विमानाचा वैमानिक देखील बेपत्ता झाला आहे.

दरम्यान, पाकिस्तानतर्फे भारताचे बेपत्ता विमान व वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचा दावा करण्यात आला असून या भारतीय वायुदलाच्या वैमानिकाला पकडतानाचे काही व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. सदर व्हिडिओमध्ये पाकिस्तानी सैनिक भारतीय वैमानिकास मारहाण करत गाडीमध्ये बसवत असल्याची दृश्ये दिसत आहेत. भारतातर्फे पाकिस्तानी सैनिकांकडून भारतीय वैमानिकाला केल्या गेलेल्या मारहाणीबाबत स्पष्ट शब्दांमध्ये खेद व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाद्वारे पाकिस्तानी उप-उच्चायुक्तांना, भारतीय जवानाच्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून पाकिस्तानने भारतीय वैमानिकास सुरक्षित ठेवावे अन्यथा कठोर परिणाम भोगावे लागतील अशी तंबी दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

https://twitter.com/ANI/status/1100747033269415936

1 COMMENT

  1. वरील बातमीपत्र व फोटो पाहण्यात आला प्रत्यक्षात ह्या फोटोमद्धे पकडण्यात आलेल्या इसमाला लांब मिशा असल्याचे पाहावयास मिळते प्रत्यक्षात पायलटना मिशा ठेवण्याची परवानगी असते का ? त्यातच त्याचे कपडे म्हणजे ड्रेस हा पायलटचा शोभत नाही ह्यावरून वरील फोटो खोटा असल्याचे समजल्यास चूक ठरेल का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)