सोशल मीडियाचे मतांवरील प्रभावाचे भाकित

– हेमचंद्र फडके 

सध्याच्या डिजिटल आणि माहितीयुगामध्ये सोशल मीडिया हा सर्वांच्याच जीवाभावाचा आणि अनेकांसाठी तो जगण्याचा अविभाज्य भाग बनला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये सोशल मीडियाची भूमिका अत्यंत महत्त्वपूूर्ण राहणार आहे. आज प्रत्येक राजकीय पक्ष सोशल मीडियाचा अत्यंत खुबीने आणि सर्वशक्‍तीनिशी वापर करत आहे. अलीकडेच सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज कंपनी असणाऱ्या इन्फोसिसचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी राहिलेले आयटी तज्ज्ञ टीव्ही मोहनदास पै यांनीही लोकसभा निवडणुकांत सोशल मीडिया हेच पक्ष आणि नेत्यांचे प्रमुख हत्यार असेल असे म्हटले आहे.

इतकेच नव्हे तर त्यांच्या मते सोशल मीडियामुळे चार ते पाच टक्‍के मते इकडे-तिकडे होऊ शकतात असे अनुमानही वर्तवले आहे. ही बाब कमी मताधिक्‍याने निवडून येणाऱ्या उमेदवारांसाठी आणि चुरशीच्या निवडणुका असणाऱ्या मतदारसंघांसाठी प्राधान्याने लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यांच्या मते, आज 40 ते 50 टक्‍के मतदारांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती पोहोचत असते आणि त्यातील बहुतांश मतदार या माहितीमुळे प्रभावित होत असतात. याचे कारण यातील अनेकांसाठी सोशल मीडिया हा माहितीचा प्राथमिक स्रोत असतो. तरुणाई, खास करून पहिल्यांदा मतदान करणारा युवा वर्ग सोशल मीडियावर सतत व्यस्त असतो. यातील बहुतांश तरुण-तरुणी निवडणुकीशी संबंधित माहितीसाठी, राजकीय रणधुमाळीविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी सोशल मीडियाचाच वापर करत असतात. आजची बहुतांश तरुणपिढी टीव्ही पहात नाही. ती व्हिडिओज पाहते. हा युवावर्ग वृत्तपत्रांच्या वाचनाला फाटा देऊन युट्युब पाहण्यात, सोशल मीडियावर रेंगाळण्यात धन्यता मानतो. त्यामुळेच या वर्गावर सोशल मीडियाचा मोठा प्रभाव आहे. हा प्रभाव लक्षात घेऊनच राजकीय पक्षांना रणनीती आखावी लागणार आहे.

सोशल मीडियामुळे प्रभावित होऊ शकणाऱ्या 4 ते 5 टक्‍के मतांचा विचार करताना यासंदर्भात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे 16 व्या लोकसभा निवडणुकांमध्ये तब्बल 95 जागांवर विजयी आणि पराभूत उमेदवारांमध्ये मतांचा फरक हा 4 ते 5 टक्‍के इतकाच होता. भाजपाच्या 29, तर कॉंग्रेसच्या 19 खासदारांनी केवळ प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा 4 ते 5 टक्‍के अधिक मते घेऊन विजय मिळवला आहे. पक्षानुसार यादी पाहिल्यास भाजपा 29 जागा, कॉंगेस 19 जागा, टीडीपी 6 जागा, टीआरएस 3 जागा, राजद 2 जागा, जदयु 1 जागा, लोजपा 1, जागा, जेएमएम 2 जागा, सीपीएम 3, सीपीआय 1 आणि अपक्ष 23 जागा अशी या 95 जागांची क्रमवारी असेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)