मसूद अझहरला काळ्या यादीत टाकण्याचा अमेरिकेचा यूएनमध्ये प्रस्ताव

नवी दिल्ली – जैश- ए- मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव अमेरिकेने संयुक्त राष्ट्रात सादर केला आहे. या प्रस्तावाला फ्रान्स आणि ब्रिटन या देशांनीही पाठिंबा दिला आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्या मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत केला होता. मात्र, चीनने नकाराधिकार वापरल्याने भारताला धक्का बसला होता. यानंतर आता अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन या देशांनी मसूद अझहरला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मांडला आहे. मसूद अझहरचा काळ्या यादीत समावेश झाल्यास पाकिस्तानमधील दौरे, आर्थिक व्यवहार आणि मालमत्ता याच्यावर निर्बंध येतील.

दरम्यान, भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून प्रयत्नशील आहे मात्र दरवेळी भारताच्या या मागणीला चीनकडून खोडा घातला जातो. आता चीन काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)