मसूद अझहरला ब्लॅक लिस्ट करण्याचा अमेरिका, इंग्लंड व फ्रान्सचा UNमध्ये प्रस्ताव

नवी दिल्ली – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी एक धक्का बसणार आहे.  जैश-ए-मोहम्मद या संघटनेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावे आणि जैशचा म्होरक्या मसूद अझहर यालाही आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावे, या मागणीसाठी भारत मागील कित्येक वर्षांपासून प्रयत्न करत होता. आता भारताच्या प्रयत्नांना अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सची साथ मिळणार आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेल्या या संघटनेसह पाकिस्तानच्या अडचणीमध्ये देखील आता वाढ होताना दिसत आहे. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मसूद अझहरला  ब्लॅक लिस्ट करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

मसूद अझहरची संपत्ती जप्त करणे, शस्त्र बंदी, प्रवास बंदी करण्याची मागणी अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्स या देशांनी केली आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रात हा प्रस्ताव मंजूर होईल की नाही हे पाकिस्तानचा मित्र चीनवर अवलंबून असेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)