मालमत्ता गहाण ठेवताय का? मग हे वाचाच

नागरिकांना आपली गरज भागवण्यासाठी कर्ज घ्यावे लागते. बॅंक कर्ज प्रदान करताना काही अटींची पूर्तता करावी लागते. कारण बॅंकेला वसुलीची हमी हवी असते. त्यामुळे बहुतांशवेळा बॅंका मालमत्ता गहाण ठेऊन गरजूंना कर्ज देतात. अशा मार्गाने घेतलेले कर्ज हे तुलनेने अधिक स्वस्त व्याजदरात उपलब्ध होऊ शकते.

बॅंकेत मालमत्ता कशी गहाण ठेवावी?
मालमत्ता बॅंकेत गहाण म्हणजेच मॉर्गेजचा अर्थ असा की, आपली मालमत्ता बॅंक किंवा हौसिंग फायनान्स कंपनीकडे कर्जाच्या सुरक्षेसाठी काही कालावधीसाठी ठेवणे होय. कर्जदाराने वेळेत कर्जाची फेड केली नाही तर बॅंक सूचना देऊन गहाण मालमत्तेची विक्री करून कर्जाची वसुली करू शकते. यासाठी दोन्ही पक्षात कायदेशीर करार केला जातो.

-Ads-

कर्जाचे कागदपत्रे तयार करताना मालमत्ता गहाण ठेवण्याषिवयी कागदपत्रे देखील तयार केली जातात. जर एकापेक्षा अधिक कर्ज घ्यायचे असेल तर त्यात वाटणी केली जाते. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अॅॅक्टच्या कलम 58 नुसार कोणतीही मालमत्ता गहाण ठेवण्याचा अर्थ हा सुरक्षेच्या दृष्टीने मालमत्तेच्या मालकी हक्कांचे हस्तांतर करणे होय.

सिंपल मॉर्गेज: मालमत्ता गहाण ठेवण्याची ही सर्वात सोपी प्रक्रिया मानली जाते. या प्रक्रियेतंर्गत गहाण ठेवण्यात येणारी मालमत्ता ही कर्ज देणाऱ्या कंपनीला किंवा बॅंकेला हस्तांतरित केली जात नाही.

इंग्लिश मॉर्गेज: या प्रक्रियेनुसार गहाण ठेवलेल्या मालमत्तेवर मिळालेले कर्ज हे वेळेत फेडण्याची हमी हा कर्जदार देतो. तोपर्यंत मालमत्तेची मालकी ही कर्ज देणाऱ्या बॅंक किंवा कंपनीच्या नावावर करण्यात येते.

अनॉमेलिस मॉर्गेज: जे मॉर्गेज साधारण गहाण प्रक्रियेत येत नाहीत, त्याला अनॉमेलिस मॉर्गेज असे म्हटले जाते.

मॉर्गेज बाय डीड: कोणताही व्यक्ती सुरक्षेच्या कारणावरून आपल्या मालमत्तेची कागदपत्रे ही कर्ज देणाऱ्या कंपनीला देतो, तेव्हा या व्यवहाराला मॉर्गेज बाय डिपॉझिट ऑफ टायटल असे म्हटले जाते.

– जगदीश काळे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)