‘शहरी गरीब’ योजना योग्यरित्या राबवा

पुणे शहर युवक कॉंग्रेसचे महापौर, आरोग्य विभागाला निवेदन


शहरी गरीब वैद्यकीय योजनेचे फलक सर्व रुग्णालयांमध्ये लावा


योजनेच्या नियम व अटींचा भंग करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा

विश्रांतवाडी – पुणे महापालिकाहद्दीत शहरी गरीब वैद्यकीय साहाय्य योजनेची योग्य अंमलबजावणी होत नाही. अनेक रुग्णालयांत ही योजना सुरू नसल्याचे सांगितले जाते. या योजनेची योग्य अंमलबजावणी करून शहरातील गरीब नागरिकांना योग्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध कराव्यात, असे मागणी करणारे निवेदन पुणे शहर युवक कॉंग्रेसकडून महापौर व आरोग्य विभागाला देण्यात आले.

या योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये गरजू व गरीब नागरिकांना कराव्या लागणाऱ्या आवश्‍यक त्या उपचाराच्या एकूण खर्चात 50 टक्‍के सूट मिळते; परंतु शहरातील बऱ्याच रुग्णालयांमध्ये सदर योजना बंद करण्यात आली आहे. अशा रुग्णालयांतील कर्मचारी नागरिकांची फसवणूक करीत आहेत. तसेच रुग्णालयांतील कर्मचारी व नागरिकांमध्ये नेहमी वाद-विवाद होण्याचे प्रकार घडत असतात. खासगी रुग्णालयांत काही एजंट मंडळीमार्फत येणाऱ्या रुग्णांनाच सवलत दिली जाते.

सर्व रुग्णालयांमध्ये ही योजना सुरू असल्याचे फलक लावण्यात यावेत. योजनेच्या नियम व अटींचा भंग केल्यास रुग्णालयांवर कठोर आणि दंडात्मक कारवाई करण्यात यावी, याची योग्य दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी युवक कॉंग्रेसचे शहाराध्यक्ष विशाल मलके, उपाध्यक्ष पियूष धीवार, सौरभ अमराळे, निनाद अक्षय माने, शहर सरचिटणीस विवेक कडू, राकेश बोर्डे, कुणाल काळे, वडगावशेरी विधानसभा युवक अध्यक्ष अभिजीत रोकडे उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)