भारताने पाकिस्तानला दिले पुलवामा हल्ल्याबाबतचे पुरावे

नवी दिल्ली: भारताने बुधवारी पुलवामा हल्ल्याशी संबंधित पुरावे पाकिस्तानला सादर केले. तसेच, पाकिस्तानात जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेचे अड्डे अस्तित्वात असल्याचा तपशीलही त्या देशाला देण्यात आला.

भारतीय लष्करी आस्थापनांना लक्ष्य करण्याचा अयशस्वी प्रयत्न पाकिस्तानी विमानांनी केला. त्याचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या प्रभारी उच्चायुक्तांना पाचारण केले. त्यावेळी त्यांच्याकडे पुलवामा हल्ल्याशी संबंधित पुराव्यांची कागदपत्रे सोपवण्यात आली. पाकिस्तानी भूमीत असणाऱ्या दहशतवादी संघटनांच्या अड्ड्यांवर तातडीने कारवाई करण्याची सूचना भारताने त्या देशाला केली. जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामात 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या बसला लक्ष्य करून दहशतवादी हल्ला घडवण्यात आला. त्या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित जैशने स्वीकारली. त्यानंतरही जैशचे अड्डे आपल्या भूमीत असल्याचे मान्य करण्यास पाकिस्तान तयार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)