प्रसिध्द हेअर स्टाइलिस्ट ‘जावेद हबीब’ यांचा भाजपात प्रवेश, म्हणाले….

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक 2019 च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आधी प्रसिध्द हेअर स्टाइलिस्ट जावेद हबीब यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

भाजपात प्रवेश करतेवेळी जावेद हबीब म्हणाले की, “मी पहिल्यांदा केसांचा चौकीदार होतो, आता देशाचा चौकीदार झालो आहे”.

लोकसभा 2019 निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल रोजी 20 राज्यात 91 जागेवर आणि दुसऱ्या टप्यात 18 एप्रिलला 12 राज्यात 35 लोकसभा जागेवर मतदान पार पडले आहे. आता 23 एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)