प्रो कबड्डी लीग स्पर्धा 2018 : जयपूरचा यु.पी.योध्दावर विजय

अहमदाबाद – जयपूर पिंक पँथर्स संघाने शुक्रवारी प्रो-कबड्डी लीगमध्ये 67 व्या सामन्यात दणदणीत विजय संपादित केला. अहमदाबाद येथील ट्रांसस्टेडिया एरीना स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने यु.पी.योध्दा संघावर 45-28 अशी सहज मात केली.

या सामन्यात जयपूर संघाकडून दीपक हूडा याने दमदार कामगिरी केली. दीपकने 10 गुण मिळवून संघाच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला. तर सुनीलने 5 गुण मिळवित त्याला चांगली साथ दिली. तर दुसरीकडे यु.पी.योध्दाकडून रिशांकने 7 गुण तर नितेश कुमारने 6 गुण मिळविले.

प्रो कबड्डी लीग स्पर्धेत अ गटात जयपूर संघ 17 गुणासह सहाव्या स्थानावर आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)