करतारपूर कॉरिडॉरची रूपरेखा तयार-दररोज 500 शीख भाविकांना परवानगी

अटारी (पाकिस्तान): करतारपूर कॉरिडॉरची रूपरेखा तयार झाली आहे. ऐतिहासिक गुरुद्वारा करतारपूर साहिब यांच्या दर्शनासाठी खुल्या करण्यात येणाऱ्या कॉरिडॉरची रूपरेखा पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने तयार केली असून ती मंजुरीसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे पाठविली आहे.

फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने तयार केलेल्या रूपरेखेनुसार दररोज 500 शीख भाविक पासपोर्टशिवाय करतारपूर साहिब नारोवालला भेट देऊ शकतील. हा कॉरिडॉर सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खुला राहणार आहे. दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना दर्शन घेऊन त्याच दिवशी भारतात परत यावे लागणार आहे.

गुरुद्वारा साहिब कडून भारतात परत येणाऱ्या मार्गात पाकिस्तान सरकार एक इमिग्रेशन सेंटर उभारणार आहे. पाकिस्तानचे कस्टम अधिकारी कागदपत्रे तपासून करतारपूर साहिबला पाठवतील. पाकिस्तानी हद्दीत गेल्यानंतर पुढील चार किलोमीटर्सचा प्रवास खास बसेसने करावा लागेल. या मार्गाचे काम युद्धपातळीवर चालू असून सहा महिन्यात ते पूर्ण करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)