प्रा. आनंद तेलतुंबडे यांची याचिका फेटाळली

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण 

मुंबई: माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना उच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. तेलतुंबडे यांनी आपल्या विरोधातील गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका न्यायालयाने आज फेटाळून लावली. मात्र त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागता यावी म्हणून पोलिसांनी तीन आठवडे त्या विरोधात अटकेची कारवाई करू नये, असे स्पष्ट केले.

माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेले सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा, स्टॅन स्वामी आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांनी आपल्याविरुद्ध दाखल गुन्हा रद्द करुन घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती बी.पी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने प्रा. आनंद तेलतुंबडे यांची याचिका फेटाळून लावली. तर गौतम नवलखा, स्टॅन स्वामी यांच्या याचिकेची सुनावणी 9 जानेवारीपर्यंत तहकूब ठेवली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)