इथेनॉल निर्मिती देणार कारखान्यांना आर्थिक स्थैर्य

आणखी वाढ करण्याच्या केंद्राच्या सूचना : अल्पदरात कर्ज होणार उपलब्ध

पुणे – वाढलेले उस उत्पादन आणि उतरलेले साखरेचे दर यामुळे कारखान्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. यातून सुटका करण्यासाठी इथेनॉल निर्मिती सुरू करण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या असून त्यासाठी अल्पदरात कर्ज उपलब्ध होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या देशात साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले आहे. असे असले तरी मागणी अभावी दर मात्र उतरलेले आहेत. या आर्थिक अडचणीत सापडलेल्या साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीचा पर्याय केंद्र शासनाने उपलब्ध करून दिला आहे. पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिश्रण करण्यास केंद्र शासनाने याआधी मंजूरी दिली असून आता या धोरणात बदल करत पेट्रोलमध्ये 22 टक्के तर डिझेलमध्ये 15 टक्के इथेनॉल मिसळण्यास परवानगी देण्याबाबत चर्चा सुरू आहे. यास मंजुरी मिळाल्यास इथेनॉलची मागणी वाढणार आहे. परिणाम साखर कारखान्यांना काही प्रमाणात आर्थिक स्थैर्यही मिळेल. त्यासाठी देशातील साखर कारखान्यांच्या संचालकांची बैठक दिल्लीत झाली. यात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.

साखर कारखान्यांनी पूरक उद्योग सुरू करायला हवेत जेणेकरून दर कमी अधिक झाल्यास त्याचा फारसा परिणाम जाणवणार नाही. त्यामुळे अनेक कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती प्रकल्प सुरू करण्यावर भर दिला आहे. मात्र, हे प्रकल्प कमी क्षमतेचे आहेत. पुढे जावून इथेनॉल मिश्रणाच्या मर्यादेत वाढ झाल्यास प्रकल्पांचीही क्षमता वाढवावी लागणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेतला असून इथेनॉल निर्मितीसाठी 6 टक्के व्याजाने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, भविष्यात वाहतूक दरही वाढवून देण्याच्या तयारीत आहे. इथेनॉल खरेदी-विक्रीतील जीएसटीचे प्रमाण समसमान ठेवले जाणार आहे. तसेच इतर पुरक गोष्टींना मान्यता दिली जाणार आहे.

इथेनॉल निर्मितीच्या प्रमाणात साखर कारखान्यांनी वाढ केल्यास त्याचा निश्‍चितच फायदा होणार आहे. गेल्या वर्षी 330 कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती झाली होती. पुढील वर्षी 450 कोटी लिटरचे टेंडर मागविण्यात येणार आहे. कारखान्यांना चांगले उत्पन्न मिळणार आहे.

– विकास रासकर, कार्याध्यक्ष, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)